राज्य गुप्तवार्ता आणि शिपाई पदावर लावतो असे आमिष दाखवून तब्बल १६ लाख ४७ हजार रुपयाची फसवणूक करणाऱ्या संशयता विरोधात गुन्हा दाखल

स्वतः पोलिस अधिकारी असल्याचा बनाव करून पोलिस भरतीमध्ये काम करतो आणि राज्य गुप्तवार्ता आणि शिपाई पदावर लावतो असे आमिष दाखवून तब्बल १६ लाख ४७ हजार रुपयांची रक्कम लाटली. त्या व्यक्ती विरोधात सिंधुदुर्गनगरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.संदीप बळवंत गुरव (३९,रा. संस्कार बंगला, शांती उद्यान, आपटेनगर, कोल्हापूर) असे संशयिताचे नाव आहे; मात्र तक्रारदार यांचे नाव गोपनीय ठेवण्यात आले आहे.संशयित संदीप गुरव याने आपण पोलिस खात्यात अधिकारी असून आपण पोलिस भरतीत राज्य गुप्तवार्ता आणि पोलिस शिपाई पदावर लावतो असे सांगून भरतीचे आमिष दाखवून १० जानेवारी २०२३ ते १५ डिसेंबर २०२३ या कालावधीत तक्रारदाराकडून आंबोली, ओरोस आणि कोल्हापूर येथून वेळोवेळी लाखो रुपये गोळा केले.यात संशयिताने तक्रारदाराकडून तब्बल १६ लाख ४७ हजार रुपयांची रक्कम गोळा केली; मात्र आपले काम होत नसल्याने आपली फसवणूक होत असल्याचे लक्षात येताच तक्रारदाराने सिंधुदुर्गनगरी पोलिस ठाणे गाठून आपली फसवणूक झाल्याचीतक्रार दिली. त्यानुसार संशयित संदीप गुरव याच्या विरोधात सिंधुदुर्गनगरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button