रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व पशू, दुग्ध व मत्स्य सहकारी संस्थांनी ३१ जुलै अखेर लेखापरिक्षण पूर्ण करण्याचे आवाहन रत्नागिरी, दि. 27 (जिमाका) : रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व पशू, दुग्ध व मत्स्य सहकारी संस्थांचे लेखापरिक्षण ३१ जुलै २०२४ अखेर पूर्ण करण्याचे आवाहन जिल्हा विशेष लेखापरिक्षक सहकारी संस्था पदुम एस. व्ही. सासवडकर यांनी केले आहे.
रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्हयातील सर्व पदुम संस्थांचे वैधानिक लेखापरिक्षण ३१जुलै २०२४ अखेर पूर्ण करुन लेखापरिक्षण अहवाल संस्था, व जिल्हा विशेष लेखापरिक्षक वर्ग–२, सहकारी संस्था, (पदुम) या कार्यालयास तसेच संबंधित जिल्हयाचे सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, (दुग्ध) यांच्या कार्यालयाला सादर करण्यात यावेत, असे आवाहन रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्हयातील पशु, दुग्ध व मत्स्य संस्थांचे पदाधिकारी व व्यवस्थापक/सचिव यांना करण्यात येत आहे. संबंधित लेखापरिक्षक यांनी आदेशित केलेले संस्थांचे व ठरावांचे पदुम संस्थांचे वैधानिक लेखापरिक्षण दिनांक ३१ जुलै २०२४ अखेर पूर्ण करुन लेखापरिक्षण अहवाल लेखापरिक्षण पूर्ण केल्याचे दिनांकापासून ०१ महिन्याचे आत या कार्यालयास तसेच संबंधित जिल्हयाचे सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, (दुग्ध) यांचे कार्यालयाला सादर करण्यात यावेत. तसेचसंबंधित संस्थांना वैधानिक लेखापरिक्षण अहवाल लेखापरिक्षण पूर्ण केल्यानंतर एक महिन्याचे आत किंवा संस्थेचा वार्षिक सभेचा अजेंडा काढणेपूर्वी १५ दिवस अगोदर यापैकी जी तारीख प्रथम असेल त्या तारखेच्या आत संस्थेला सादर करण्यात यावा. 000