मुसळधार व वादळी पावसामुळे महावितरण कंपनीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान

रत्नागिरी जिल्ह्यात दि. २४.०७.२०२४ पासून सुरू झालेल्या मुसळधार व वादळी पावसामुळे महावितरण कंपनीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होऊन, अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला होता.गेल्या २ दिवसांमध्ये २१ उपकेंद्रे, ११३ फिडर, ८९९ गावे, ५९ उच्चदाब वाहिनीचे पोल, १८५ लघुदाब वाहिनीचे पोल व ३,८२,०४८ ग्राहक बाधित झाले होते.त्यापैकी २१ उपकेंद्रे, ११३ फिडर, ८८३ गावे, २३ उच्चदाब वाहिनीचे पोल, ५४ लघुदाब वाहिनीचे पोल व ३,७९,२५७ ग्राहक यांचा वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला आहे.सद्यस्थितीत रत्नागिरी जिल्ह्यातील राजवाडी, बावनदी, तरवळ-बौध्दवाडी , विल्ये-शीतपवाडी, सावडाव, मिलन, हासबे, जवळेथार, आजीवले, गोवळ, वाकेड, बोरथडे, इंदवटी, निवेशी, कुवे, पन्हळे गावांतील अंदाजे २४०० ग्राहकांचा वीजपुरवठा बंद असून, सदर वीज पुरवठा संध्याकाळ पर्यंत चालू करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button