- मालवण शहरात हत्ती रोगाच्या जंतू असलेली एक वृद्ध महिला मालवण येथे सापडली आहे. हत्तीरोगापासून बचाव करण्यासाठी आरोग्य यंत्रणेला सहकार्य करावे असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सई धुरी यांनी केले आहे.सिंधुदुर्ग येथील जिल्हा परिषद आरोग्य विभाग येथील दालनात हत्ती रोग आणि किटकजन्य आजार याबाबत पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी आरोग्य अधिकारी डॉ. सई धुरी या बोलत होत्या. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी धुरी म्हणाल्या, मालवण शहरात हत्तीरोगाच्या निर्मूलनासाठी सातत्याने प्रयत्न करुन रुग्ण संख्या कमी झाली आहे. परंतु 8 जुलै रोजी मालवण सोमवार पेठ येथील 66 वर्षीय एक महिला हत्तीरोग जंतू सदृश्य आढळली. त्यानंतर सर्वेक्षणात गवंडी वाडा येथे दोन रुग्ण आढळून आले आहेत. या भागातील 1558 लोकांचे रक्ताचे नमुने घेण्यात आले आहेत. यासाठी हत्तीरोगासाठी शहरामध्ये 1232 रक्तांचे नमुने घेण्यात आले आहेत. येथील कुटुंबांना 2 हजार 200 औषधांचे वाटप करण्यात आले आहे.या तीन व्यक्तींमध्ये आता कोणतेही लक्षणे दिसून येत नाहीत, परंतु ब्लड सॅम्पल मध्ये जंतू सापडला असल्यामुळे आवश्यक उपचार सुरू केले आहेत. मालवण शहरांमध्ये सर्वेक्षण करण्यासाठी आरोग्य यंत्रणेने 10 टीमच्या माध्यमातून 46 कर्मचारी नेमले आहेत. 4355 कुटुंबांच्या सर्वेक्षणामध्ये रक्तांचे नमुने घेतले जाणार आहेत..
Back to top button