
निळवणे ता.खेड येथील कातळवाडीकडे जाणाऱ्या रस्त्यावर पडलेल्या भेगांची तहसीलदार श्री.सुधीर सोनावणे यांचेकडून भर पावसात पाहणी
अतिवृष्टीमुळे निळवणे ता.खेड येथील कातळवाडीकडे जाणाऱ्या डोंगरालगतच्या रस्त्याला पडल्या भेगा असुन गेल्या चार ते पाच दिवसांतच त्या प्रचंड प्रमाणात रुंदावत असून काही भाग खचलाही आहे.गेल्या दोन तीन दिवसांपासून पावसाने रौद्ररूप धारण करून कोकणाला अक्षरशः झोडपून काढले आणि याच अतिवृष्टीमुळे भुस्खलन होण्याचे प्रकार अनेक ठिकाणी घडत असुन असाच एक प्रकार खेड तालुक्यातील निळवणे ता.खेड या गावातील कातळवाडीला जाणाऱ्या डोंगर रस्त्याला मोठ्या प्रमाणात भेगा पडल्या आहेत.त्या मुळे या रस्त्याचा वापर बंद करण्यात आला असून दिवसागणिक भेगा वाढत असून त्या रुंदावल्या जात असल्याने भूस्खलन होण्याची शक्यता नाकारता येणार नसल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.या रस्त्याला काही ठिकाणी भेगा पडण्याच्या घटना घडत असून काही ठिकाणी रस्त्याचा भाग खचला असून खचलेला भाग फुटभर वरखाली झाला आहे.सकाळी अस्पष्ट दिसणारे तडे संध्याकाळ पर्यंत वाढत जाऊन काही प्रमाणात रुंदावल्या आहेत. हा रस्ता पूर्ण चढ उताराचा असून डोंगर भागातून गेला आहे.हा रस्ता धोकादायक तर बनला आहेच परंतु भेगा वाढत जाऊन भूस्खलन झाल्यास मोठा धोका होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.त्यामुळे खेड चे तहसीलदार श्री.सुधीर सोनावणे यांनी सदर रस्त्याची भर पावसात ग्रामस्थांसमवेत पाहणी करून संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सुचना दिल्या तर ग्रामस्थांना आवश्यक काळजी घेण्याचे आवाहन केले. मा.तहसिलदार साहेबांनी तात्काळ भर पावसात प्रत्यक्ष पाहणी करून संबंधितांना केलेल्या सुचना व ग्रामस्थांशी प्रत्यक्ष साधलेला संवाद याबद्दल ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.यावेळी त्यांचे सोबत भरणे मंडळाचे मंडळ अधिकारी श्री.उमाकांत देशमुख, शिरवली सजाचे तलाठी श्री.सुरेश मुंडे, निळवण्याच्या ग्रामसेविका श्रीम.ज्योती आमरे, निळवण्याचे पोलिस पाटील श्री.जगन्नाथ कदम यांचेसह ग्रामस्थ उपस्थित होते.