देव तुम्हाला चांगले बोलण्याची बुद्धी देवो- उद्धव ठाकरे यांना नारायण राणे यांचा टोला
भाजप नेते नारायण राणे व माजी मुख्यमंत्री कधीच एकमेकांविषयी चांगले बोलत नाहीत. नेहमीच एकमेकांवर जहरी टीका करीत सर्वांचे लक्ष वेधून घेत असतात. दोघेंही एकमेकांवर आरोप करण्याची कधीच संधी सोडत नाही.त्यामुळे दोघांतील हे नेहमीच ताणलेले असलेले संबंध सर्वांनाच माहित आहेत. त्यातूनच नारायण राणे यांनी शुक्रवारी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. पण यावेळी त्यांनी खोचक शब्दांत त्यांच्यावर निशाणादेखील साधला.उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना नारायण राणेंनी खोचक शब्दांत टीका केली. “उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तुमच्या इच्छा पूर्ण होवोत. देव तुम्हाला चांगले बोलण्याची बुद्धी देवो. भावीला काही अर्थ नाही, भावीच राहतो. उद्धव ठाकरेच्या पक्षाला गळती लागली आहे, असा खोचक टोला राणे यांनी यावेळी लगावला