विधानसभा निवडणुकीसाठी वरिष्ठांनी विचार केल्यास गुहागरसाठीही इच्छूक– आमदार सदानंद चव्हाण
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी चिपळूण-संगमेश्वर मतदारसंघातून मला उमेदवारी मिळाल्यास ही जागा माझ्यासाठी सोपी आहे. मात्र गुहागर मतदारसंघाशीही माझी नाळ जुळलेली आहे. पाटपन्हाळे माझे गाव आहे. त्यामुळे वरिष्ठांनी जागा वाटपात मला गुहागरला उमेदवारी दिल्यास मी इच्छूक असल्याचे शिवसेनेचे उपनेते, माजी आमदार सदानंद चव्हाण यांनी येथे सांगितले.गुहागर येथे एका खासगी कामानिमित्त आलेल्या माजी आमदार चव्हाण यांनी शृंगारतळी येथे पत्रकारांशी संवाद साधला. ते पुढे म्हणाले की, माझ्या गेया १० वर्षाच्या आमदारकीच्या कारकिर्दीत मी कोट्यावधींची कामे चिपळूण-संगमेश्वर मतदारसंघात केली आहेत. येथील जनतेचा माझ्यावर विश्वास आहे. त्यामुळे चिपळूण माझ्यासाठी लकी आहे. त्यामुळे मला चिपळुणातून उमेदवारी मिळावी अशी कार्यकर्त्यांचीही मागणी आहे. www.konkantoday.com