राज्याचे पर्यटन धोरण २०२४ राज्य शासनाने जाहीर केले
पर्यटन विकासासाठी महत्वपूर्ण ठरणारी पर्यटन पॉलिसी अर्थात पर्यटन धोरण २०२४ राज्य शासनाने जाहीर केले आहे. त्यामुळे आता इतर पर्यटन विकासाच्या योजनांचे एकत्रिकरण पर्यटन धोरणात निश्चित करण्यात आले आहे. महाराष्ट्र हे जागतिक स्तरावरील भौगोलिक, आर्थिक, दळणवळण अशा वैविध्यपूर्ण साधनांनी उपलब्ध असलेला प्रदेश असून अशा सर्व ठिकाणांची आर्थिक उलाढाल करण्याची क्षमता विचारात घेवून अशा प्रमुख पर्यटक केंद्रांचा विकास करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. दरम्यान यासाठी ऑनलाईन यंत्रणेद्वारे एक खिडकी प्रणाली सक्षमपणे कार्यरत करण्यात येणार आहे.पर्यटन क्षेत्रात आगामी १० वर्षाच्या कालावधीसाठी अंदाजे एक लक्ष कोटी नवीन खासगी गुंतवूक आकर्षित करण्यात येणार आहेत. त्यामुळे किमान १८ लाख व्यक्ती इतका रोजगार निर्माण होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.स्थानिकांना उपजिविकेचे पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी ग्रामीण पर्यटन, कॅराव्हॅन पर्यटन, अनुभवात्मक पर्यटन, पर्यटन गावे, कृषी पर्यटन, इको-टुरिझम यांचा समावेश आहे. www.konkantoday.com