मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संभाव्य दौऱ्यामध्ये विकास कामांबाबत लोकार्पण, भूमिपुजन करण्यात येणार
माझी लाडकी बहीण, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण, वयोश्री योजना, तीर्थ दर्शन योजना, येथील विमानतळ इमारत, प्रांत कार्यालय भूमिपुजन, मिनी थिएटर, लोकमान्य टिळक स्मारक लोकार्पण आदीं कार्यक्रम लवकरच होणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संभाव्य दौऱ्यामध्ये विकास कामांबाबत लोकार्पण, भूमिपुजन करण्यात येणार असल्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी सांगितले. त्यासाठी सर्व यंत्रणांनी जबाबदारीने आणि गतीने ही कामे मार्गी लावावीत असे सांगितले.संभाव्य मुख्यमंत्री दौऱयांया अनुषंगाने पालकमंत्री सामंत यांनी येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात विविध विकास कामांच्या अनुषंगाने गुरूवारी आढावा बैठक घेतली. या बैठकीला जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार, अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी आदींसह विविध विभाग प्रमुख उपस्थित होते.पालकमंत्री सामंत यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण, वयोश्री योजना, तीर्थ दर्शन योजना, विमानतळ, प्रांत कार्यालय भूमिपुजन, मिनी थिएटर, लोकमान्य टिळक स्मारक लोकार्पण आदींबाबत सविस्तर आढावा घेतला. या दौऱयाया पार्श्वभूमीवर सर्व यंत्रणांनी जबाबदारीने आणि गतीने ही कामे मार्गी लावावीत. त्याचबरोबर या सोहळ्यात विविध योजनांच्या लाभार्थ्यांना लाभ देण्याबाबतही संबंधित यंत्रणेने कार्यवाही पूर्ण करावीत असे निर्देश सामंत यांनी प्रशासन यंत्रणेला दिले आहेत.