दापोली येथील १०० फुटी ध्वजस्तंभाचे आ. योगेश कदम यांचे हस्ते उदघाटन -ना. उदय सामंत
दापोली येथील तहसिल कार्यालयाच्या आवारात सुमारे ३३ लाख रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या १०० फुटी ध्वजस्तंभाचे उदघाटन येत्या आठ दिवसात दापोलीचे आमदार योगेश कदम यांच्या हस्ते करण्यात येईल, अशी माहिती पालकमंत्री ना. उदय सामंत यांनी दापोली दौर्यावर पत्रकारांशी बोलताना दिली.मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण या योजनेचा शुभारंभ करण्यासाठी पालकमंत्री ना. उदय सामंत सामंत हे दापोली येथे आले असताना सुमारे ३३ लाख रुपये खर्च करून दापोली तहसिल कार्यालयाच्या आवारात उभारण्यात आलेल्या ध्वजस्तंभावर मागील १५ ऑगस्ट, २६ जानेवारी व १ मे रोजी ध्वजारोहण करण्यात न आल्याने हा ध्वजच शोभेचा ठरला असून येत्या १५ ऑगस्ट रोजी तरी या ध्वजस्तंभावर ध्वजारोहण करण्यात येईल का असा प्रश्न पत्रकारांनी पालकमंत्री ना. उदय सामंत यांना विचारला असता येत्या आठ दिवसात या १०० फुटी ध्वजस्तंभाचे उदघाटन आ. योगेश कदम यांचे हस्ते करण्यात येईल असे सामंत यांनी सांगितले. www.konkantoday.com