झाडगाव येथील श्री छत्रपती शिवाजी हायस्कूलमध्ये लोकशाही मतदान प्रक्रियेने विद्यार्थी मंत्रिमंडळाची निवडणूक रत्नागिरी, दि. 26 (जिमाका) :- झाडगाव येथील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल झाडगाव येथे शैक्षणिक वर्ष 2024-25 करिता शालेय मंत्रिमंडळाची निवडणूक लोकशाही पध्दतीने मतदान प्रक्रिया राबवून काल गुरुवारी पार पडली. इ. 5 वी ते 10 वी अखेरचा जनरल सेक्रेटरी तसेच इतर शालेय मंत्रिमंडळाची निवड करण्यात आली.

* निवडणुकीमध्ये 147 विद्यार्थी – विद्यार्थिनींनी मतदानाचा हक्क बजावला जनरल सेक्रेटरी पदाकरिता मुलांमधून 4 उमेदवार तर, विद्यार्थीनी प्रतिनिधी म्हणून मुलींमधून 3 उमेदवार उभे होते. निवडणूक आयोगाच्या नियमाप्रमाणे लोकसभा व विधानसभा यांच्या निवडणुका ज्या पद्धतीने पार पडतात त्याचपद्धतीने शालेय मंत्रिमंडळाची निवडणूक यावेळी पार पडली. ज्या पद्धतीने निवडणुकीच्या वेळी संपूर्ण ठिकाणी वातावरण असते, त्याच पद्धतीचे वातावरण निर्मिती या ठिकाणी करण्यात आली होती. आजचे विद्यार्थी हे उद्याचे भावी नागरिक आहेत. उज्ज्वल देश घडविण्यासाठी मतदान हे प्रत्येक नागरिकाला करावेच लागते आणि यासाठीच या पद्धतीचे आयोजन करण्यात आले होते. मतपत्रिका तयार करण्यात आल्या होत्या. मतदान कक्ष, मतपेटी, केंद्राध्यक्ष मतदान अधिकारी यांची नेमणूक करण्यात आली होती. संपूर्ण प्रक्रिया विद्यार्थ्यांच्याही लक्षात यावी, याकरिता दोन दिवस आधी विद्यार्थ्यांना नियम समजावून सांगून तयारीसाठी पूर्ण वेळ देण्यात आला होता. मतदानाच्या दिवशी 100 मीटर रेषा आखण्यात आली होती. निकाल घोषित करत असताना संपूर्णपणे सुसूत्रीपणा आणि नियमाच्या अधीन राहून निकाल घोषित करण्यात आला. इयत्ता पाचवी ते दहावी अखेरच्या सर्व विद्यार्थ्यांना पारदर्शकरित्या निकाल समजावा यासाठी प्रोजेक्टर ची व्यवस्था करण्यात आली होती मोठ्या पडद्यावर 5 फेऱ्यांमध्ये निकाल घोषित करण्यात आला. जनरल सेक्रेटरी म्हणून आदित्य डांगे निवडून आला, तर मुलींमधून विद्यार्थिनी प्रतिनिधी म्हणून ग्रंथा मोरे निवडून आली. भारतीय निवडणूक आयोगाच्या नियमाप्रमाणे संपूर्ण मतदान प्रक्रियेच्या कामकाजारिता निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तानाजी गायकवाड यांनी काम पाहिले तर मतदान केंद्राध्यक्ष म्हणून दीपक पाटील यांनी काम पाहिले. त्याचबरोबर निवडणूक अधिकारी व मतमोजणीचे काम अमोल मंडले, अशोक सुतार, मारुती पाटील, स्वप्नाली भुजबळराव व सागर कदम यांनी काम पाहिले. सर्व निवडणूक प्रक्रिया शांततेत व उत्साहाच्या वातावरणात पार पडली. निवड झालेल्या जनरल सेक्रेटरी तसेच विद्यार्थिनी प्रतिनिधी व इतर शालेय मंत्रिमंडळातील मंत्र्यांचा शपथविधी लवकरच मुख्याध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण करण्यात येईल असे यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी श्री.गायकवाड यांनी सांगितले. 000

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button