चिपळूण नगर परिषदेने भंगार व्यवसायीकाकडून दीड लाख रुपये केले वसूल
दोन वर्षापूर्वी लिलावाने घेतलेल्या बाजारपुलाच्या लोखंडाचे सुमारे दीड लाख रुपये ठकवणार्या संबंधिम भंगार व्यावसायिकाने हे पैसे अखेर सोमवारी भरले.काही वर्षापूर्वी चिपळूण नगर परिषदेने नवा बाजारपूल बांधल्यानंतर अनेक कारणांमुळे सुमारे ५ लाख रुपये खर्च करून जुना बाजारपूल तोडण्यात आला. मुळातच तोडलेल्या पुलाचे लोखंड संबंधित ठेकेदाराने न्यायचे असतानाही तत्कालीन काही अधिकार्यांच्या हट्टामुळे यातून निघालेले हजारो टन लोखंड नगर परिषदेत जमा करण्यात आले. त्यानंतर तत्कालीन मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे यांच्या मार्गदर्शनाखाली तत्कालीन नगर अभियंता परेश पवार व बांधकाम विभागातील काही अधिकार्यांनी त्याचा लिलाव केला. त्यानुसार त्याची किंमत सुमारे दीड लाख रुपये झाली. त्यानुसाार वरील दोन मुख्य अधिकार्यांची येथून बदली झाली. याचा फायदा घेत संबंधित भंगार व्यावसायिक याचे पैसे भरण्यास टाळाटाळ करीत होता.www.konkantoday.com