चिपळूणच्या सुपुत्राचा अवघ्या पाच मिनिटात शंभर स्वरसिद्ध नोटस ब्लाईंड फॉल्डेड ओळखण्याचा वर्ल्ड रेकॉकर्ड
सध्या पुण्यात शिकत असलेल्या माझ भाटी याने अवघ्या पाच मिनिटात डोळे बंद करून शंभर पीच परफेक्ट नोटस ओळखण्याचा नवा विक्रम केला आहे. माझ भाटी हा चिपळूण येथील गरीबांचे डॉक्टर अशी ओळख असलेले पै. डॉक्टर नूर सरगुरोह यांचा नातू आहे. वसिम आणि सबा यांचा तो चिरंजीव आहे. अवघ्या पाच मिनिटात शंभर स्वरसिद्ध नोटस ब्लाईंड फॉल्डेड ओळखण्याचा वर्ल्ड रेकॉकर्ड त्याने केला आहे.६ डिसेंबर २०२३ रोजी तेरा वर्षाच्या माझ भाटीने फुर्टाडोस म्युझिक, पुणे येथे पाच मिनिटात शंभर स्वरसिद्ध नोटस ब्लाईंंड फॉल्टेड ओळखून एक नवीन जागतिक विक्रम स्थापित केला आहे. हा अविश्वसनीय विक्रम हाय रेंज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने मान्य केला आहे.नाझच्या असामान्य संगीत आणि क्षेत्रातील कामगिरीबद्दल त्याचे कौतुक होत आहे. त्याची नोटस ओळखण्याची क्षमता खरोखरच उल्लेखनीय आणि असामान्य प्रतिभेची आहे, असे सिम्बॉयसिस इंटरनॅशनल स्कूल पुणेचे प्राचार्य यांनी सांगितले. त्यांच्या या यशामुळे केवळ शाळेचा नावलौकीक वाढला आहे. शिवाय तरूण संगीतकारांनाही यातून प्रेरणा मिळेल, असेही त्यांनी सांगितले. माझ भाटीया संगीत प्रवास लहान वयात सुरू झाला. उत्कटता आणि ×उत्कटतेसाठीच्या समर्पणाने प्रेरित होवून त्याच्यातील नैसर्गिक संगीत क्षमतेने त्याला जागतिक ओळख मिळाली आहे. आणि तो जागतिक संगीतकारांसाठी एक आदर्श ठरला आहे. www.konkantoday.com