रत्नागिरीचे जिल्हाधिकारी व जिल्हा दंडाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, यांनी काेराेना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासंदर्भात नवे पुरवणी आदेश जाहीर केले

आदेश

A. सर्व सिनेमागृह (Single Screens and Multiplexes) / हॉटेल्स । रेस्टॉरंट/ शॉपींग मॉल 50%
क्षमतेने सुरु ठेवता येतील.
B. कोणतेही सामाजिक / सांस्कृतिक । राजकीय । धार्मिक मेळावे आयोजित करता येणार नाहीत, असे
कार्यक्रम आयोजित केल्यास संबंधित जागा / आस्थापना मालकाकडून आपत्ती व्यवस्थापन
कायद्यांतर्गत दंड वसूल केला जाईल.
C. लग्न समारंभात 50 पेक्षा जास्त लोक उपस्थित राहण्यास परवानगी असणार नाही. त्याकरीता संबंधित
उपविभागीय दंडाधिकारी यांधेकडील पुर्व परवानगी आवश्यक राहील.
D. अंतिम संस्कारासाठी 20 पेक्षा जास्त लोक उपस्थित राहण्यास परवानगी असणार नाही. अंतिम
संस्कारासाठी 20 पेक्षा जास्त लोक उपस्थित राहणार नाहीत याची दक्षता ग्राम कृती दल / नागरी कृती
दल यांनी घ्यावयाची आहे.
E. गृह अलगिकरणाकरीता खालील निबंध निर्गमित करण्यात येत आहेत,
.
i, गृह अलगिकरण झालेल्या नागरीक । रुग्ण विषयीची माहिती संबंधित स्थानिक प्राधिकरण
यांना कळविणे, तसेच गृह अलगिकरण व्यक्ती ही कोणत्याही वैदयकीय व्यवसायिकाच्या
(डॉक्टर) यांचे देखरेखीखाली आहे याची देखील माहिती स्थानिक प्रशासनास देणे बंधनकारक
राहील.
i. कोव्हीड -19 रुग्ण असलेल्या ठिकाणी सुरवातीच्या दिवसापासून 14 दिवसांपर्यंत प्रवेशव्दारावर
किंवा दर्शनी ठिकाणी फलक लावावा लागेल, जेणेकरून त्या ठिकाणी कोव्हीड -19 म्ण
असलेची माहिती नागरिकांना होईल
ii. कोव्हीड – 19 + Ve रुग्णांना गृह अलगिकरण (Home Quarantine) असा शिक्का मारणे.
iv. सदर कोव्हीड -19 रुग्ण गृह अलगिकरण केलेल्या ठिकाणी संबंधित कुटुंबातील व्यक्तींनी
घराबाहेर कमीत कमी संपर्क ठेवून शक्य तितक्या मर्यादित हालचाली कराव्यात तसेच मास्क
परिधान केलेशिवाय सदर ठिकाणी कोणतीही हालचाल किंवा वावर करू नये, याविषयी दक्षता
घेणेत यावी.
४. गृह अलगिकरणाची कोणत्याही प्रकारचे उल्लंघन झालेस सदर कोव्हीड -19 रुग्ण किंवा
अलगिकरण झालेले नागरिक यांना स्थानिक प्रशासनाने सुरु केलेल्या कोव्हीड केअर
सेंटरमध्ये (CCC) मध्ये स्थलातरीत केले जाईल,
Scanned by CamScanner
F. सर्व कार्यालये | आस्थापना ( आरोग्य व इतर अत्यावश्यक असलेल्या आस्थापना वगळता) ही 50%
क्षमतेच्या अधिन राहून सुरू राहतील, घरातून काम (Work from home) करणेबाबत प्रोत्साहित
करणे. सर्व धार्मिक ठिकाणच्या व्यवस्थापन करणान्या विश्वस्त यांनी संबंधित धार्मिक ठिकाणच्या
परिसरामध्ये उपलब्ध असणारी जागा आणि पुरेश सामाजिक अंतर राखले जाणेच्या दृष्टीकोनातून
लाशी विपक्षी पायांगताना प्रवेश देणेत येईल या संख्येची निश्चिती करुन त्याबाबत प्रसिध्दी करणे,
आविक तसेच ज्यागतासाठी ऑनलाईन आरक्षण किंवा इतर सोयीच्या पध्दतींचा वापर करणे.
वरीलप्रमाणे आस्थापना व कार्ये खालील अटीस अधिन राहून सुरु ठेवता येतील.
i योग्य रितीने मास्क परिधान न केल्यास प्रवेशास परवानगी दिली जाणार नाही,
. तापमान मोजण्याचे साधन (thermal gun) प्रवेशव्दारावर उपलब्ध ठेवावे, जेणेकरून ताप
(Temperature) असलेल्या कोणत्याही व्यक्तीस प्रवेश दिला जाणार नाही
iii. वेगवेगळया सोयीस्कर ठिकाणी पुरेशा प्रमाणात Hand Sanitizers उपलब्ध ठेवावे.
iv. मास्कचा योग्य वापर तसेच सामाजिक अंतराबाबत अंमलबजावणीकरीता संबंधित
आस्थापनांनी पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध ठेवावे.
वरील आदेशाचे उल्लंघन झाल्यास वर उल्लेखित केल्याप्रमाणे संबंधित आस्थापना कोव्हीड 19
संसर्गाच्या केंद्र शासनाकडील आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या पुढील आदेशापर्यत बंद राहतील. तसेच
आपत्ती व्यवस्थापन कायदयांतर्गत संबंधित, जागा मालक / आस्थापना / आयोजक यांना दंड आकारला
जाईल.
यापूर्वी वेळोवेळी परवानगी दिलेल्या बाबी । क्षेत्र पूर्ववत सुरु राहतील. तसेच कोरोना बाधित
क्षेत्रात (Continment Zone) वरील नमुद बाबी लागू राहणार नाहीत.
सदरचा आदेश आज दिनांक 17 मार्च 2021 रोजी माझ्या सही व शिक्क्यानिशी निर्गमित केला आहे.

जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी
रत्नागिरी
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button