आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका, गटप्रवर्तकांना सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला

राज्यातील आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका, गटप्रवर्तकांना सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय राज्य सरकारने मंगळवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला आहे. यामध्ये अपघाती मृत्यूस दहा लाख आणि अपंगत्वासाठी पाच लाख रुपयांच्या अनुदानाची तरतूद करण्यात आली आहे. अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठकीमध्ये दिली आहे. या अनुदानासाठी प्रतिवर्षी अंदाजे १ कोटी ५ लाख रुपये इतका निधी मंजूर करण्यात आला. हा निर्णय १ एप्रिल २०२४ पासून लागू करण्यात येईल. सध्या ७५ हजार ५७८ आशा स्वयंसेविका आणि ३६२२ गटप्रवर्तक कार्यरत असल्याचीही माहिती यावेळी दिली.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button