आता पश्चिम रेल्वेने मुंबई सेंट्रल-ठोकूर, मुंबई सेंट्रल-सावंतवाडी रोड, वांद्रे टर्मिनस-कुडाळ, अहमदाबाद-कुडाळ, या दरम्यान ६ गणपती विशेष गाड्याच्या एकूण ५० फेऱ्या
गणेशोत्सवानिमित्य कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेनंतर आता पश्चिम रेल्वेने मुंबई सेंट्रल-ठोकूर, मुंबई सेंट्रल-सावंतवाडी रोड, वांद्रे टर्मिनस-कुडाळ, अहमदाबाद-कुडाळ, या दरम्यान ६ गणपती विशेष गाड्याच्या एकूण ५० फेऱ्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे.त्यामुळे पश्चिम रेल्वे मार्गावरून कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.मुंबई सेंट्रल – ठोकुर साप्ताहिक विशेष ६ फेऱ्या -पश्चिम रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, ट्रेन क्रमांक ०९००१ मुंबई सेंट्रल – ठोकूर साप्ताहिक गणपती स्पेशल मुंबई सेंट्रल येथून दर मंगळवारी दुपारी १२ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ८.५० वाजता ठोकूरला पोहोचेल. ही ट्रेन ३ ते १७ सप्टेंबर पर्यंत धावेल. त्याचप्रमाणे ट्रेन क्रमांक ०९००२ ठाकूर – मुंबई सेंट्रल साप्ताहिक स्पेशल दर बुधवारी रात्री ११ वाजता ठाकूर येथून सुटेल आणि मुंबई सेंट्रल येथे दुसऱ्या दिवशी सकाळी ७ वाजता पोहोचेल. ही ट्रेन ४ ते १८ सप्टेंबर पर्यंत धावेलमुंबई सेंट्रल – सावंतवाडी रोड गणपती विशेष २६ फेऱ्याट्रेन क्रमांक क्रमांक ०९००९ मुंबई सेंट्रल – सावंतवाडी रोड स्पेशल मुंबई सेंट्रल येथून दररोज (मंगळवार वगळता) रात्री १२ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी २.३० वाजता सावंतवाडी रोडला पोहोचेल. ही ट्रेन २ ते १६ सप्टेंबर पर्यंत धावेल. त्याचप्रमाणे ट्रेन क्रमांक ०९०१० सावंतवाडी रोड – मुंबई सेंट्रल स्पेशल सावंतवाडी रोडवरून दररोज (बुधवार वगळता) सकाळी ४.५० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी मुंबई सेंट्रलला रात्री ८.१० वाजता पोहोचेल. ही ट्रेन ३ ते १७ सप्टेंबर पर्यंत धावेल.वांद्रे टर्मिनस – कुडाळ साप्ताहिक विशेष ६ फेऱ्याट्रेन क्रमांक ०९०१५ वांद्रे टर्मिनस – कुडाळ साप्ताहिक स्पेशल वांद्रे टर्मिनस येथून दर गुरुवारी दुपारी २.४० वाजता सुटेल आणि कुडाळला पहाटे ३.३० वाजता पोहोचेल. ही ट्रेन ५ ते १९ सप्टेंबर पर्यंत धावेल. त्याचप्रमाणे ट्रेन क्रमांक ०९०१६ कुडाळ – वांद्रे टर्मिनस साप्ताहिक स्पेशल कुडाळ येथून दर शुक्रवारी सकाळी ४.३० वाजता सुटेल आणि त्याच दोवाशी ६.१५ वाजता वांद्रे टर्मिनसला पोहोचेल. ही ट्रेन ६ ते २० सप्टेंबर पर्यंत धावेलअहमदाबाद – कुडाळ साप्ताहिक विशेष ६ फेऱ्याट्रेन क्रमांक ०९४१२ अहमदाबाद – कुडाळ साप्ताहिक विशेष गाडी अहमदाबादहून दर मंगळवारी सकाळी ९.३० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे ३.३० वाजता कुडाळला पोहोचेल. ही ट्रेन ३ ते १७ सप्टेंबर पर्यंत धावेल. त्याचप्रमाणे ट्रेन क्रमांक ०९४११ कुडाळ – अहमदाबाद साप्ताहिक स्पेशल कुडाळ येथून दर बुधवारी सकाळी ४.३० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी रात्री ११.४५ वाजता अहमदाबादला पोहोचेल. ही ट्रेन ४ ते १८ सप्टेंबरपर्यंत धावेल.विश्वमित्री – कुडाळ साप्ताहिक विशेषच्या ६ फेऱ्याट्रेन क्रमांक ०९१५० विश्वामित्री – कुडाळ साप्ताहिक विशेष गाडी विश्वामित्री येथून दर सोमवारी सकाळी १० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी ३.३० वाजता कुडाळला पोहोचेल. ही ट्रेन २ ते १६ सप्टेंबर पर्यंत धावेल. त्याचप्रमाणे ट्रेन क्र. ०९१४९ कुडाळ – विश्वामित्री साप्ताहिक स्पेशल कुडाळ येथून दर मंगळवारी सकाळी ४.३० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी रात्री १० वाजता विश्वामित्री येथे पोहोचेल. ही ट्रेन ३ ते १७ सप्टेंबर पर्यंत धावेलआरक्षण -सहाही गणपती विशेष गाड्याचे आरक्षण भारतीय रेल्वेच्या सर्व आरक्षण केंद्रावर आणि आयआरसीटीसीच्या संकेस्थळावर २८ जुलै २०२४ पासून सुरु होणार आहे.