लाटांच्या ताडाख्यामुळे पंधरामाड येथे संरक्षक बंधाऱ्याला मोठे भगदाड
रत्नागिरी परिसरात गेले दोन दिवस मुसळधार पाऊस कोसळत आहे यामुळे समु्द्राला आलेल्या उधानामुळे अज्रस्त्र लाटा किनाऱ्यावर आदळत आहे. त्याचा फटका मिऱ्याच्या संरक्षक बंधाऱ्याला बसला आहे. लाटांच्या ताडाख्यामुळे पंधरामाड येथे संरक्षक बंधाऱ्याला मोठे भगदाड पडले आहे. तेथून समु्द्राचे पाणी मानवी वस्तीत घुसण्याची शक्यता आहे. लाटाचा तडाखा कायम राहिल्यास पंधरामाड येथील वस्तीला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.सातत्याने पडणाऱ्या पावसामुळे व जोरदार वाऱ्यामुळे समुद्र खवळलेला असून जोरदार लाटांचा प्रहार किनाऱ्यावर होत आहे. मुरुगवाडा ते मिऱ्या दरम्यान किनाऱ्यावर लाटांचा मारा मोठ्याप्रमाणात होत आहे. याठिकाणी असणार्या जुन्या बंधाऱ्याला लाटांच्या माऱ्याने भगदाड पडले आहे. या बंधाऱ्याचे दगड लाटांच्या मार्याने समुद्रात सरकत आहेत. त्यामुळे पडलेल्या भगदाडातून पाणी आत नागरी वस्तीच्या दिशेने येत आहे.मिऱ्या ते मुरुगवाडा दरम्यान बंधाऱ्याचे काम सुरु असून त्यातील शंभर ते दोनशे मीटरचे काम शिल्लक आहे. या शिल्लक असलेल्या ठिकाणीच आता भगदाड पडले आहे. उर्वरीत किनारा सुरक्षित करण्यासाठी बंधाऱ्यावर टेट्रापॉट टाकण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे लाटांचा मारा कमी करण्यासाठी गोयन पध्दतीचे बंधारेही टाकण्यात आले आहेत.