रत्नागिरी शहरातील मोठे खड्डे बुजवण्यासाठी आता पेवर ब्लॉक चा वापर
रत्नागिरी शहरातील खड्ड्यांच्या प्रश्नावरून नागरिकांच्या प्रचंड नाराजी व असंतोष निर्माण झाल्यानंतर आता या प्रश्नावरून सर्वच पक्ष रस्त्यावर उतरले आहेत सुरुवातीच्या काळात मनसे नंतर काल शिंदे यांची शिवसेना व आज भारतीय जनता पक्ष व ठाकरेंची शिवसेना खड्ड्यांच्या प्रश्नावरून रस्त्यावर उतरली होती खड्डे पडल्यानंतर त्यात चिरयांचे तुकडे भरण्यास सर्वांनीच आक्षेप घेतला होता हे खड्डे डांबराने भरावे तसे मागणी होत होती प्रत्यक्षात पावसाळी डांबराचा वापर करून खड्ड्यात खडी घालून बुजवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता परंतु वाहतूक झाल्यानंतर खडी रस्त्यावर येत होती त्यामुळे पूर्वीसारखा खड्डे निर्माण होतो जे त्यामुळे आता मोठे खड्डे बुजवण्यासाठी रत्नागिरी नगर परिषदेने पेवर ब्लॉकचा वापर सुरू केला आहे सध्या मारुती मंदिर सर्कलला प्रचंड मोठा खड्डा पडला होता त्यात चेहऱ्याचे तुकडे घालून बुजवण्याचा प्रयत्न झाला होता मात्र तो प्रयोग अयशस्वी झाला होता तो खड्डा आता बुजवण्यासाठी पेवर ब्लॉकचा वापर करण्यात येत आहे रत्नागिरी शहरातील आठवडा बाजार येथे काही वर्षांपूर्वी असाच मोठा खड्डा निर्माण झाला होता त्यावेळी तो पेवर ब्लॉकने बुजवण्यात आला होता तो प्रयोग यशस्वी झाला होता त्यामुळे आता खडबडून जागे झालेल्या रत्नागिरी नगर परिषदेने पेवर ब्लॉकचा वापर करून खड्डे बुजवण्यास सुरुवात केली आहे मात्र यासाठी वापरण्यात येणाऱ्या पेवर ब्लॉकची कॉलिटी हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे सध्या गटारांसाठी वापरण्यात आलेल्या पेवर ब्लॉकची क्वालिटी अत्यंत निष्कृष्ट दर्जाची आहे तशाच पद्धतीचा पेवर ब्लॉक चा वापर खड्डे बुजवण्यासाठी केला तर हा प्रयोग यशस्वी होण्याऐवजी अयशस्वी होण्याची शक्यता जास्त आहे मात्र नगरपरिषदेने आता खड्डे बुजवण्यासाठी कोणत्या दर्जाचा पेवर ब्लॉक चा वापर केला आहे व त्यांचा हा प्रयोग यशस्वी होणार की नाही हे लवकरच स्पष्ट होणार आहे