मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमुळे ऑनलाईन अर्ज भरणाऱ्या यंत्रणेलादेखील 1 कोटी 21 लाख 64 हजार 300 रुपयांचा लाभ
रत्नागिरी, दि. 25 (जिमाका) : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज ऑनलाईन भरणाऱ्या अंगणवाडी सेविका, मदतनीस, पर्यवेक्षिका, डाटा एन्ट्री ऑपरेटर आदी यंत्रणेला प्रत्येक अर्जामागे 50 रुपये असे जिल्ह्याच्या एकूण 2 लाख 43 हजार 286 पात्र महिला लाभार्थ्यांच्या अर्जांसाठी 1 कोटी 21 लाख 64 हजार 300 रुपयांचा लाभ मिळणार आहे.* पालकमंत्री उदय सामंत यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसह विविध योजनेंबाबत आढावा घेतला. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत मंडणगड 8266, दापोली 28277, खेड 24146, चिपळूण 34323, गुहागर 21997, संगमेश्वर 29937, रत्नागिरी 50885, लांजा 19365, राजापूर 26090 असे एकूण 2 लाख 43 हजार 286 पात्र महिलांची संख्या आहे. ऑफलाईन प्राप्त झालेल्या अर्जांची संख्या 2 लाख 23 हजार 900 त्यापैकी ऑनलाईन केलेल्या अर्जांची संख्या 1 लाख 52 हजार 792 इतकी आहे. तर 71 हजार 108 ऑनलाईन करावयाचे अर्ज आहेत. उर्वरित पात्र महिलांची संख्या केवळ 19 हजार 386 इतकी असून सध्या साध्य शेकडा प्रमाण 92.03 इतके आहे. येत्या काही दिवसात उर्वरित लाभार्थ्यांचे अर्ज देखील विविध यंत्रणेमार्फत भरुन घेऊन 100 टक्के उद्दिष्ट गाठले जाईल. या योजनेंतर्गत लाभार्थ्यांना 1500 रुपये थेट त्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहेत. त्याशिवाय हे अर्ज ऑनलाईन दाखल करुन देणाऱ्या यंत्रणेला प्रत्येक अर्जामागे 50 रुपये असे एकूण 1 कोटी 21 लाख 64 हजार 300 रुपयांचा फायदा देखील या योजनेमुळे होणार आहे.000