
निवडणूक आयोगाकडून ओमराजे निंबाळकर, कैलास पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. ओमराजे निंबाळकर, कैलास पाटील यांच्यासह त्यांच्या दोन अंगरक्षक अशा एकूण चार जणांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश निवडणूक आयोगाकडून देण्यात आले आहेत.मतमोजणी केंद्रात अंगरक्षकासह प्रवेश केल्यानं आचारसंहितेचा भंग झाल्याची तक्रार राष्ट्रवादीच्या उमेदवार अर्चना पाटील यांनी केली होती, त्यानंतर आता निवडणूक आयोगाकडून ओमराजे निंबाळकर, कैलास पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश निवडणूक आयोगाकडून देण्यात आले आहेत.शिवसेना ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार कैलास पाटील यांच्याविरोधात आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश निवडणूक आयोगाकडून देण्यात आले आहेत. निवडणुक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी गुन्हा नोंद करण्याचे आदेश दिले आहेत.www.konkantoday.com