दहावी- बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर पोहचता नाही आले तर त्यांनी पुन्हा परीक्षा देता येणार
बारावीच्या पुरवणी परीक्षेसंदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. सध्या संपूर्ण राज्यात मुसळधार पाऊस सुरु आहे. पावसामुळे विद्यार्थी परीक्षा केंद्रावर पोहचू न शकल्यास त्यांना परीक्षा देता येईल, अशी माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी सांगितले आहे.सध्या राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसामुळे पुरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे. या परिस्थितीत जर पुरवणी परीक्षेसाठी दहावी- बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर पोहचता नाही आले तर त्यांनी पुन्हा परीक्षा देता येणार आहे.