सततच्या मागणीनंतर वडवली-शेवरे मार्गावर ४५ वर्षानी धावली लालपरी

मंडणगड तालुक्यातील देव्हारे, वडवली, आतले, शेवरे मार्गे चींचघर हा रस्ता ४५ वर्षापूर्वी होवून देखील या रस्त्यावरून एस.टी. गाडी धावत नव्हती. वडवली, आतले, शेवरे ग्रामस्थ मंडळींनी या गावांतून मुंबई एस.टी. गाडी चालू करावी यासाठी कित्येक वर्षे सतत मागणी करत होते. या गावांतून गाडी नसल्याने मुंबईला जाणार्‍या व मुंबईवरून येणार्‍या चाकरमान्यांची तसेच ग्रामस्थांची खूपच गैरसोय होत होती. देव्हारे अथवा चींचघर या गावातून खाजगी वाहने किंवा पाई प्रवास करून या गावात जाणे शक्य होत होते. सर्वांना खासगी बसने प्रवास करावा लागत असे. ग्रामीण भागातील तालुक्यात शिक्षण घेणार्‍या विद्यार्थी तसेच आजारी वृद्ध लोकांना तालुक्याच्या ठिकाणी जाण्यासाठी गैरसोय होत असे. www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button