संकल्प कलामंच रत्नागिरी 18+(एटीन प्लस) या शॉर्टफिल्मचे अनावरण.
संकल्प कलामंच रत्नागिरी या संस्थेच्या गुरुपौर्णिमेनिमित्त गुणवंतांचा गुणगौरव हा समारंभ पार पडला. या समारंभात श्री ज्ञानेश्वर कृष्णा पाटील लिखित आणि दिग्दर्शित “18+(एटीन प्लस) सावधान मुलगी वयात येते ” या शॉर्ट फिल्मचे अनावरण समारंभाचे अध्यक्ष श्री वामन जोग, प्रमुख पाहुण्या सौ. भक्ती सावंत-बोरकर ,ॲड. ढवण यांच्या हस्ते करण्यात आले.वयात आलेल्या मुलीच्या आयुष्यावर भाष्य करणारी फिल्म समाज प्रबोधन करणारी आहे. या शॉर्टफिल्म साठी टी. डब्ल्यू. जे.असोसिएट, समीर माजगावकर, वामा लुक यांचे सहकार्य लाभले. या शॉर्ट फिल्ममध्ये ज्येष्ठ अभिनेते अभय खडपकर, धनवंत कासेकर, सानिका महाडिक ,रक्षता पालव ,सुयोग बारगोडे,आशिष पाटील यांनी भूमिका साकारले आहेत.या शॉर्टफिल्मच्या निर्मितीसाठी आणि अनावरण कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष विनोद वायंगणकर,गजानन गुरव,डॉ. दिलीप पाखरे, प्रकाश ठीक ,गणेश गुळवणीसर, विनयराज उपरकर ,बाबा साळवी ,नंदू भारती ,उमेश मोहिते इत्यादींचे सहकार्य लाभले.लवकरच ही शॉर्ट फिल्म युट्युबच्या माध्यमातून रसिकांच्या भेटीला येणार आहे.