रत्नागिरी ते दिवा पॅसेंजर दादरपर्यंत न्यावी, अन्यथा रेल रोको आंदोलन करावे लागेल….. कोकणी प्रवाशांचा रेल्वे प्रशासनाला इशारा
कोकण रेल्वेच्या मार्गावरील धावणार्या रत्नागिरी दिवा पॅसेंजर ट्रेन दादरपर्यंत नेण्यासाठी कोकण रेल्वेच्या अधिकार्यांना आदेश देवून रत्नागिरी जिल्ह्यातील प्रवाशांना दिलासा द्यावा अन्यथा रेल्वे रोको सारखे आंदोलन छेडावे लागेल, असा इशारा जिल्ह्यातील, कोकणातील प्रवाशांनी दिला.रत्नागिरी दादर ही पॅसेंजर ट्रेन जिल्ह्यातील प्रवाशांच्या हितार्थ असून दिव्याहून पुढे जाण्यासाठी प्रवाशांना तारेवरची कसरत करावी लागत असून असा प्रवास करणे जिवावर बेतणार असून खर्चीक, माकसिक, शारिरीक त्रास सहन करावा लागत आहे. दादर येथे पोचल्यावर कोकणवासिय प्रवाशांना टॅक्सी म्हणा, बेस्टच्या बसेस, लोकल ट्रेनमधून मुंबईच्या उपनगरात जाणे सोपे व सोईचे होत आहे. याची गंभीर दखल विद्यमान खासदार सुनिल तटकरे यांनी घेवून रत्नागिरी दिवा दादरपर्यंत नेण्याच्या दृष्टीने तत्काळ पावले उचलावीत आणि कोकण रेल्वेच्या अधिकार्यांना तसे आदेश द्यावेत. जेणेकरून रत्नागिरी दादर पॅसेंजर मधून प्रवाशांचा होणारा प्रवास सुरक्षित होवून होणारी गैरसोय दूर करून त्यांना दिलासा द्यावा अशी मागणी कोकणवासीय प्रवासी जनतेतून होत आहे.www.konkantoday.com