रत्नागिरी जिल्ह्यात खेड तालुक्यात लोटे एमआयडीसीत एक्सेल इंडस्ट्रीज कंपनीमध्ये वायूगळती, अनेक ग्रामस्थ बाधित, ग्रामस्थांचा गेट समोर ठिय्या
_खेड तालुक्यातील लोटे एमआयडीसीत मंगळवारी रात्री उशिरा एक्सेल इंडस्ट्रीजमध्ये वायुगळती झाली.चिपळूणच्या लोटे एमआयडीसीतील कंपनीत वायू गळतीवायू गळतीने ४० जण बाधित, झाल्याचे कळते तर आठ जण अस्वस्थ आहेत या गळतीमुळे पुन्हा एकदा लोटे केमिकल एमआयडीसी चर्चेत आली आहे. या वायुगळतीच्या दुर्घटनेनंतर घटनेनंतर लोटे परिसरातील ग्रामस्थ संतापलेले आहेत.कोकणात रत्नागिरी जिल्ह्यात खेड तालुक्यात लोटे एमआयडीसीत एक्सेल इंडस्ट्रीज कंपनीमध्ये वायूगळती झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. वायूगळतीमुळे चाळकेवाडी आणि लोटे परिसरात अनेक वाड्यातील लोकांना श्वसनाचा त्रास होऊ लागल्याची माहिती परिसरातील स्थानिकांनी दिली आहे. मंगळवारी रात्री उशिरा नऊ वाजण्याच्या सुमारास हा सगळा धक्कादायक प्रकार घडलागॅस लिकेज झाल्याची प्रत्यक्षदर्शीनी माहिती दिली आहे. ग्रामस्थांना घरडा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. १० ग्रामस्थांवर उपचार करून घरी सोडण्यात आले आहे. मात्र बाधितांची संख्या जास्त असल्याचे कळते या प्रकारामुळे ग्रामस्थ संतप्त झाले होते त्यांनी कंपनीच्या गेटवर येऊन ठिय्या मांडला कंपनीवर कारवाई करावी अशी ते मागणी करत होते