पुन्हा एकदा विविध मागण्यासाठी सरपंच करणार ९ ऑगस्ट ला मुंबईत आंदोलन

मुंबई प्रतिनिधी राजकीय पक्षाशी हित संबंध नसले सरपंच संघटना राज्यभर कार्यरत आहे राज्यातील सरपंच उपसरपंच सदस्यांच्या विविध मागण्यासाठी मुंबई आझाद मैदान मोर्चा धरणे आंदोलन सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्याच्या प्रलंबित मागण्या आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी तत्काळ सोडाव्यात या मागण्याची दखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी घेऊन मागण्या सोडविण्याबाबत लवकरच अधिकृत घोषणा करावी अधिवेशना दरम्यान विधानभवनात झालेल्या बैठकीत दिलेल्या आश्वासनाची अंमलबजावणी करावी यासाठी शुक्रवार दि ९ आॅगस्ट २०२४ रोजी सकाळी ११ वाजता पुन्हा धरणे आंदोलन करण्यात येणार आहे अशी माहिती सरपंच संघटीत चळवळीचे नेतृत्व बाबासाहेब पावसे पाटील अँड प्रविण कडाळे यांनी एका पत्रकाद्वारे दिली आहे राज्य शासनाच्या वेगवेगळ्या योजना सर्व सामान्य माणसापर्यंत पोहचविण्यासाठी सरपंच उपसरपंच अहोरात्र मेहनत करून आम जनतेला दिलासा देण्यासाठी सतत प्रयत्न करत असतो अशा या सरपंच उपसरपंच याच्या मानधन सरसकट पंधरा हजार उपसरपंच सात हजाराची वाढ करावी , सरपंच पदाच्या कार्यकाळात पंधरा लाखाचे विमा संरक्षण देण्यात यावे, सरपंच ग्रामसेवक यांची संयुक्त मासिक बैठक आयोजित करण्यात यावी ,सरपंचावर हल्ला करणाऱ्याना विशेष संरक्षण कायदा लागूकरावा राज्यातील आजी माजी सरपंच उपसरपंच यांचे थकीत मानधन तत्काळ वर्ग करावे माजी सरपंच यांना पेन्शन सुरू करावी अनेक दिवसांपासून सरकारकडे पाठपुरावा करून मागण्यासाठी अनेक आंदोलने सुद्धा करण्यात आली होती. परंतू सरकारने दखल घेतली नाही त्यामुळे आम्हाला नाईलाजास्तव मुंबईच्या आझाद मैदानावरती अधिवेशना दरम्यान आंदोलन करण्याची वेळ आली आहे. या वेळी आंदोलनकर्त्यांनी दिलेल्याघोषणांनी आझाद मैदानाचा परिसर दणाणून सोडला होता सरपंचांच्या आंदोलनाची राज्याचे ग्राम विकास मंत्री गिरीश महाजन यांनी दखल घेत सरपंचाच्या मागण्याबाबत राज्य सरकार सकारात्मक असल्याचे मंत्री महाजन यांनी सरपंचांच्या शिष्टमंडळाला सांगत लवकरच मंत्रालयात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समवेत बैठक घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले त्यानंतर सरपंच सेवा संघाच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानभवनात जाऊन भेट घेतली सरपंचाच्या मागण्या सोडविण्याबाबत त्यांना साकडे घातले परतू अबलबजावणी होत नाही सरपंच उपसरपंच यांच्या मागण्या मान्य होईपर्यंत हा लढा सुरूच राहणार असल्याचा इशारा सरपंच सेवा संघाचे सरपंच संघटीत चळवळीचे नेतृत्व बाबासाहेब पावसे आदर्श सरपंच अशोक ओहळ विजय पाटील अविनाश पवार नंदकुमार कदम अरूण खरमाटे डॉ तान्हाजी पाटील सौ पुजा जाधव जानु गायकर लता खोत संजय काळे बाबाजी गुळवे निलेश पावसे सोमनाथ नाडे रोहित पवार अमोलशेवाळे रविंद्र पवार यांनी राज्य सरकारला दिला आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button