
पुढील दोन दिवस सावधान! या भागांना IMD कडून अतिवृष्टीचा इशारा!!
पुढील २ दिवसांत गुजरातसह कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रात अतिवृष्टीची शक्यता आहे. त्यानंतरही या भागांत पावसाचा जोर कायम राहणार असल्याचे हवामान विभागाने बुधवारी सांगितले. मध्य भारतात पुढील २ दिवसांत मुसळधार पाऊस कायम राहण्याची शक्यता आहे आणि त्यानंतरच्या ३ दिवसांत पावसाचा जोर कायम राहणार असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.**मराठवाडा, विदर्भातही पावसाचा जोर कायम*तसेच आज कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्राला आज अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. २४ ते २५ जुलै दरम्यान मराठवाड्यातील काही भागात जोरदार पावसाची शक्यता आहे. विदर्भातही २४ ते २६ जुलै दरम्यान पावसाचा जोर कायम राहील. कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रात २४ ते २८ जुलै दरम्यान पावसाचा जोर अधिक राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.*राज्यात सर्वदूर मुसळधार पाऊस*कोकणातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांतील घाट भागातही तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. उत्तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्येही तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राने वर्तवला आहे.मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये घाट भागातील तुरळक ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.