नागरिकांच्या तक्रारी नंतर ठेकेदारांचे आश्वासन पंचायत समितीच्या प्रांगणात मात्र पांगरी भोईवाडा रस्त्याची दुरवस्था कायम
गुहागर तालुक्यातील पांगरीतर्फे हवेली येथील पायरी भोईवाडा हा रस्ता गेल्या वर्षी पावसाळ्यात वाहून गेला होता. यानंतर येथील नागरिकांच्या तक्रारीनंतर यावर्षीच्या उन्हाळ्यात हा रस्ता दुरूस्ती करून देण्याचे आश्वासन ठेकेदाराने दिले होते. मात्र अद्यापही या रस्त्याच्या दुरूस्तीकडे त्याने दुर्लक्ष केल्याने भर पावसाळ्यात येथील ग्रामस्थांची मोठी गैरसोय झाली आहे.पायरी भोईवाडा हा १७५ मीटरचा रस्ता २०२३ मध्ये सुमारे ५ लाख रुपये खर्चून करण्यात आला. मात्र पहिल्याच पावसात रस्ता वाहून गेल्याने रस्त्याला खड्डे पडले. या रस्त्याच्या दुरूस्तीबाबत येथील सामाजिक कार्यकर्ते असीफ दळवी यांनी पंचायत समिती बांधकाम विभागाकडे तक्रार केली होती. यावेळी अधिकार्यांच्या मध्यस्थीने ठेकेदाराने हा रस्ता पुन्हा दुरूस्त करून देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र प्रत्यक्ष कार्यवाही न झाल्याने आता यावेच्या पावसात रस्त्याची खूपच दयनीय अवस्था होवून वाहतुकीला अडथळा येत आहे. www.konkantoday.com