
ठाकरे गटाचे पक्षाचे उमेदवार अमोल कीर्तिकर यांच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास मुंबई उच्च न्यायालयाचा नकार
लोकसभा निडणुकीत मुंबईतील उत्तर पश्चिम मतदारसंघातील ठाकरे गटाचे पक्षाचे उमेदवार अमोल कीर्तिकर यांनी मंगळवारी उच्च न्यायालयात निवडणूक याचिका दाखल केली होती.मुंबई उत्तर पश्चिम मतदार संघाच्या निकालासंदर्भात महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. या याचिकेवर सुनावणी घेण्यास मुंबई उच्च न्यायालयाचा नकार दिल्याची माहिती आहे. तसेच, दुसऱ्या न्यायाधिशांच्या खंडपीठासमोर सुनावणी घ्यावी अशी सूचनाही दिली आहे.लोकसभा निवडणुकीत शिंदे गटाचे रवींद्र वायकर यांच्या निकालाला आव्हान देत, ठाकरे गटाचे उमेदवार अमोल कीर्तिकर यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. या याचिकेत वायकर यांची मुंबई उत्तर-पश्चिम मतदारसंघातून खासदार म्हणून झालेली निवडणूक ‘रद्द आणि निरर्थक’ घोषित करण्यात यावी, अशी विंनतीही केली आहेमतमोजणीच्या दिवशीच मतांमध्ये तफावत आढळून आल्याने अमोल किर्तीकरांनी पुन्हा मतमोजणीसाठी अर्ज दाखल केला होता. पण मतमोजणीसाठी नियुक्त केलेल्यानिवडणूक अधिकाऱ्यांकडून अनेक गंभीर त्रुटी झाल्या. मतमोजणी प्रक्रियेशी संबंधित नियमांचे उल्लंघन करण्यात आले. 333 बोगस मतदारांनी केलेल्या मतदानाचीह निकालावर परिणाम झाला. निवडणूक अधिकाऱ्याने मतमोजणी करण्यात घाई केली. असाही दावा कीर्तिकरांनीयाचिकेत केला आहे. त्याचबरोबर याचिकेवरील सुनावणीच्या वेळी या मतदारसंघातील संपूर्ण मतमोजणी प्रक्रियेचे चित्रीकरण सादर करण्याचे आदेश दिले जावेत, अशी मागणी किर्तीकरांनी याचिकेतून केली आहे.