
जगबुडी नदीवरील पुलाच्या दुरूस्तीला राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाच्या अधिकार्यांच्या निगराणीखाली सुरुवात…
मुंबई-गोवा महामार्गावरील खेडमधील जगबुडी नदीच्या नवीन पुलावरील एक्स्पानशन जॉईंटचे कॉंक्रीट निघाल्याने भगदाड पडल्याची घटना घडली. यामुळे कोणतीही दुर्घटना होवू नये म्हणून जिल्हा प्रशासन आणि राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाने या पुलावरील वाहतूक बंद केली असून दुसर्या पुलावरून दोन्ही बाजूकडील वाहतूक रविवारी सायंकाळी ६ वाजल्यापासून सुरू केली आहे. या भगदाड पडलेल्या पुलाच्या दुरूस्तीचे काम सुरू झाले असून रॅपिड हार्डिंग सिमेंट वापरून तो भाग नव्याने जोडण्यात येणार आहे. या सर्व प्रक्रियेला पुढील १० ते १५ दिवस लागण्याची शक्यता लागणार असून पावसाचा जोर कायम राहिल्यास अधिकचा कालावधी लागण्याची शक्यता असल्याची माहिती राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाच्या अधिकार्यांनी दिली आहे. हे दुरूस्तीचे काम राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाच्या अधिकार्यांच्या निगराणीखाली सुरू आहे. www.konkantoday.com