कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजना इच्छुकांनी अर्ज करावेत रत्नागिरी, दि. 24 (जिमाका): सामाजिक न्याय विभागाकडून अनु.जाती व नवबौध्द घटकांना १०० टक्के अनुदानावर (मोफत) शेतजमीन उपलब्ध करून देण्याकरिता दि. १४ ऑगस्ट २०१८ च्या शासननिर्णयानुसार कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना राबविण्यात येते. तरी इच्छुक पात्र अर्जदाराने सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, रत्नागिरी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, पहिला मजला, कुवारबांव, रत्नागिरी यांच्याकडे अटींची पूर्तता करणारे पुरावे / कागदपत्रासह संपर्क साधून अर्ज करण्याचे आवाहन समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त संतोष चिकणे यांनी केले आहे.

लाभाचे स्वरुप :- या योजनेअंतर्गत अनु.जाती व नवबौध्द घटकाच्या दारिद्रय रेषेखालील भूमीहीन कुटुंबाला जमीन उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ४ एकर कोरडवाहू (जिरायती) जमीन किंमत कमाल रु.५ लाख प्रती एकर किंवा २ एकर ओलीताखालील (बागायती जमीन किंमत कमाल रु.८ लाख प्रती एकरलाभार्थी निवडीचे निकष :-लाभार्थी अनु.जाती व नवबौध्द घटकातील असावा. लाभार्थी दारिद्रय रेषेखालील भूमीहीन असावा. लाभार्थीचे किमान वय १८ ते ६० वर्षे असावे. निवडीचे प्राधान्यक्रम :-दारिद्रय रेषेखालील भूमीहीन परित्यक्त्या स्त्रिया. दारिद्रय रेषेखालील भूमीहीन विधवा स्त्रिया. अनु.जाती / जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदयांतर्गत अनु.जातीचे अत्याचारग्रस्त.000

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button