अडचणी व सर्व्हर डाऊनमुळे नागरिक दाखल्यांसाठी ताटकळले
जिल्हाधिकारी कार्यालयातील सेतु, महाईसेवा व नागरी सुविधा केंद्रे सर्व्हर डाऊन होत असल्याचे प्रकार होत असल्याने त्याचा परिणाम सोमवारी ऑनलाईन सेवांवर झाला. ही सेवा ठप्प झाल्याने जिल्हाधिकारी कार्यालयातील सेतूमध्ये शेकडो नागरिक दिवसभर ताटकळत राहिले होते. सायंकाळी उशिरापर्यंत सर्व्हरचा तांत्रिक दोष कायम राहिल्याने नागरिकांना दाखले न घेताच घरी परत जावे लागले.सध्या शैक्षणिक कामांसाठी लागणारी कागदपत्रे, दाखले व नागरिकांना व्यक्तीगत कामासाठी लागणारे दाखले, कागदपत्र मिळविण्यासाठी मोठी धावपळ करावी लागत आहे. राज्य सरकारच्या महाआयटी विभागामार्फत सेतू महा ई सेवा केंद्राच्या माध्यमातून शासकीय अनुज्ञप्ती, जात पडताळणी दाखले प्रमाणपत्र, रहिवास प्रमाणपत्र, उत्पन्न दाखले, नागरिकत्व प्रमाणपत्र तसेच अनेक शासकीय कागदपत्रे ऑनलाईन देण्यात येतात. www.konkantoday.com