
मच्छी वाहतूक करणार्या ट्रकमधून रस्त्यावर पाणी सोडत असल्याने वाढते अपघात,पोलिस खात्याकडून दुर्लक्ष
सध्या मोठ्या प्रमाणावर मच्छीचे वाहतूक होत असून मच्छी घेऊन जाणारे ट्रक मच्छी भरून परगावी जात आहेत मात्र हे मच्छीचे ट्रक चक्क रस्त्यातच मच्छीचे पाणी सोडत असल्याने अपघात होत आहेत
दोन दिवसांपूर्वी पाण्यावरून घसरून १० ते १२ दुचाकींना अपघात झाले हाेते.मात्र याबाबत एरव्ही नियमांचा बागुलबुवा दाखविणाऱ्या पोलीस खात्याकडून ट्रकचालकांकडून कोणतीही कारवाई केली जात नाही अशाप्रकारे भर रस्त्यात पाणी सोडत जाणार्या मच्छीच्या ट्रकला अडवून काही जागरूक नागरिकांनी त्याला जाब विचारला व मच्छीचे पाणी सोडण्याचा कॉक बंद करायला लावला व वाहनधारकाला अडवून त्याची चांगलीच खडरडपट्टी काढली.
रस्त्यावर मासे वाहतूक करणार्या गाडीच्या सांडलेल्या पाण्यावरून दुचाकी वाहने घसरून अपघात घडल्याची घटना घडली होती रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गावर साळवी स्टॉप येथे भंगार व्यावसायिकांसमोर हे अपघात झाले. रस्त्यावर सांडलेल्या पाण्यावरून ५ ते १० मिनिटांच्या कालावधीत धडाधड दुचाकि सह चालक पडण्याचा प्रकार झाला होता. या अपघाताच्या मालिकांमुळे अनेक वाहनांचे नुकसान झाले. अनेकजण जखमी झाले. अपघातांच्या या प्रकारामुळे संंबंधित यंत्रणेने या प्रकरणी कायमची उपाययोजना करून वाहनधारकांना सुरक्षा पुरवावी, अशी मागणी होत आहे. www.konkantoday.com
