
ताम्हाणेच्या दयानंद चव्हाणला सुवर्ण आणि रौप्य पदक
नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठामार्फत आयोजित केलेल्या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत राजापूर तालुक्यातील ताम्हाणे गावचा सुपुत्र दयानंद दीपक चव्हाण याने सुयश संपादन केले. त्याने दोनशे मीटर धावण्याच्या स्पर्धेत सुवर्णपदक तर लांब उडीत रौप्यपदक पटकावले. त्याने मिळविलेल्या नेत्रदीपक यशाबद्दल सर्व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
www.konkantoday.com