
मुद्रा योजनेअंतर्गत मिळणाऱ्या कर्जाची मर्यादा १० लाखांवरून २० लाख रुपयांपर्यंत वाढवली
_लोकसभा निवडणुकीनंतर केंद्रात पुन्हा एकदा सरकार स्थापन झाल्यानंतर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन हे नवनिर्वाचित सरकारचा पहिला अर्थसंकल्प आज सादर करत आहेत. अर्थसंकल्पात लघुउद्योजकांना सरकारने मोठा दिलासा देत मुद्रा योजनेअंतर्गत मिळणाऱ्या कर्जाची मर्यादा १० लाखांवरून २० लाख रुपयांपर्यंत वाढवली आहे. सरकारने कर्जाची मर्यादा थेट दुप्पट केल्याने व्यवसाय उभारणीसाठी प्रयत्नशील असणाऱ्या उद्योजकांना मदत होणार आहे.आर्थिकदृष्ट्या कमकुवत असणाऱ्या लोकांना व्यवसाय उभारणीत मदत व्हावी, यासाठी केंद्र सरकारने खास कर्जाची व्यवस्था करुन ठेवली आहे. रस्त्यावर फळे-भाज्या विकणे असो किंवा इतर कुठलाही लहान व्यवसाय करणाऱ्यांसाठी सरकार कोणत्याही गॅरंटीशिवाय १० लाख रुपयांपर्यंतचे कर्ज देते. यापूर्वी सदर योजनेत १० लाख रुपयांपर्यंतचे कर्ज मिळत होते. या कर्जाची मर्यादा २० लाख रुपयांपर्यंत करण्याचे आश्वासन भाजपने लोकसभा निवडणुकीपूर्वी दिले होते. या आश्वासनाची पूर्तता करत आज अर्थमंत्र्यांकडून कर्जमर्यादा वाढवण्याची घोषणा करण्यात आली



