
बारसू येथे प्रस्तावित असलेला ग्रीन रिफायनरी प्रकल्प लवकरात लवकर मार्गी लावण्याची मागणी
राजापूर तालुक्यातील बारसू येथे प्रस्तावित असलेला ग्रीन रिफायनरी प्रकल्प लवकरात लवकर मार्गी लावावा, अशी मागणी बारसू येथील शेतकरी विनायक कदम यांनी केली आहे.हा प्रकल्प खासदार नारायण राणे मार्गी लावू शकतात याची सर्वांना खात्री आहे. त्यासाठी लवकरच स्थानिक शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ घेऊन राणे यांची भेट घेणार असल्याचे कदम यांनी सांगितले.रिफायनरी प्रकल्पाविषयी पत्रकारांशी बोलताना कदम म्हणाले, प्रकल्पाला विरोध असल्याचे केवळ भासवले जात आहे. प्रत्यक्षात किती आणि कुणाचा विरोध आहे, हे तपासले पाहिजे. ज्यांनी या प्रकल्पाला विरोध केला ते आता कुठे दिसत नाहीत. कधी विरोध करायचा तर कधी पाठिंबा द्यायचा, अशी दुटप्पी भूमिका स्थानिक आमदार घेत आहेत. विकासासाठी इथल्या बेरोजगारांना रोजगार देण्यासाठी काहीच केले नाही. कायमच भावनिक राजकारण करून पोळी भाजली. स्थानिक जनतेला हा प्रकल्प हवा आहे. या प्रकल्पामुळे राजापूरचे मागासलेपण दूर होईल. स्थानिक बेरोजगार तरुणांना रोजगार मिळेल.