पीएम सूर्यघर योजनेअंतर्गत ३०० युनिट मोफत वीज
ऊर्जा सुरक्षेवर भर देताना अर्थमंत्री म्हणाल्या की, यावर धोरणात्मक दस्तऐवज जारी केला जाईल, ज्यामध्ये रोजगार आणि शाश्वततेवर भर दिला जाणार आहे. पीएम सूर्य घर मोफत वीज योजना सुरू करण्यात आली आहे, जी छतावर सौर संयंत्रे बसवले जातात. याद्वारे १ कोटी घरांना दरमहा ३०० युनिटपर्यंत मोफत वीज मिळणार आहे. या योजनेअंतर्गत १.२८ कोटी नोंदणी आणि १४ लाख अर्ज यापूर्वीच प्राप्त झाले आहेत, ही एक उल्लेखनीय कामगिरी असल्याचे त्यांनी सांगितलं.*एमएसएमईसाठी क्रेडिट हमी योजना*बांधकाम क्षेत्रातील एमएसएमईसाठी क्रेडिट गॅरंटी योजनेबाबत, अर्थमंत्र्यांनी एमएसएमईंना यंत्रसामग्री आणि उपकरणे खरेदीसाठी हमीशिवाय दीर्घकालीन कर्ज देण्यासाठी एक नवीन योजना सुरू केली जाणार असल्याची माहिती दिली. हा निधी १००कोटी रुपयांपर्यंतची हमी देणार आहे.