गेल्यावर्षीप्रमाणे याहीवर्षी दहिहंडीला सार्वजनिक सुट्टी

_दहिहंडीच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी देण्यासंदर्भात परिपत्रक काढून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गेल्यावर्षीप्रमाणे याहीवर्षी दहिहंडीला सार्वजनिक सुट्टी जाहिर केल्याबद्दल आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले आहेत. त्याचबरोबर मुंबई आणि एम.एम.आर. क्षेत्रातील ८ ते १० लाख गोविंदा दहिहंडीच्या दिवशी रस्त्यावर येत असून त्यापैकी बहुतांश गोविंदा हे खाजगी क्षेत्रामध्ये काम करणारे कर्मचारी असतात. त्यामुळे खाजगी कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना देखील सार्वजनिक सुट्टी देण्याबाबत प्रधान सचिव श्री. इक्बालसिंह चहल यांच्याकडे आमदार प्रताप सरनाईक यांनी विनंती केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button