
कोरोनानंतर सलग चार वर्षांत चिपळूण तालुक्याची आमसभा नाही
कोरोनानंतर सलग चार वर्षांत चिपळूण तालुक्याची आमसभा झाली नव्हती. या आमसभेची मागणी झाल्यानंतर पंचायत समिती प्रशासनाला जाग आली.त्यानुसार २९ ऑगस्टला सकाळी ११ वा. कापसाळ येथील माटे सभागृहात आयोजित केली आहे. दीर्घकाळानंतर ही आमसभा होत असल्याने तालुक्यातील अनेक महत्त्वाचे मुद्दे या आमसभेत चर्चेला येण्याची शक्यता आहे.मागील विधानसभा निवडणुकीनतंर पहिल्याच वर्षी २०१९ ला आमदार शेखर निकम यांच्या उपस्थितीत आमसभा झाली होती. त्यानंतर कोरोनामुळे आमसभेचा मुद्दा बाजूला राहिला. पुढील चार वर्षांत एकदाही आमसभा झाली नाही. सुरुवातीच्याआमसभेत महावितरण, एसटी महामंडळ, पंचायत समिती, पाटबंधारे विभाग, कृषी, आरोग्य आदी विविध विभागांशी संबंधित काही मुद्दे ऐरणीवर आले होते.