अनंत अंबानीला लग्नात मिळाली 3 कोटींची कार, प्राइवेट जेट, हेलिकॉप्टर अन्. झुकरबर्गचं गिफ्ट एकदम स्पेशल

अनंत अंबानीला लग्नात मिळाली 3 कोटींची कार, प्राइवेट जेट, हेलिकॉप्टर अन्. झुकरबर्गचं गिफ्ट एकदम स्पेशलअनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाची चर्चा फक्त भारतातच नाहीतर जगभरात बघायला मिळतंय. कित्येक महिन्यांपासून या लग्नाचे प्री वेडिंग फंक्शन विविध ठिकाणी सुरू होते. 12 जुलै 2024 रोजी मुंबईमध्ये अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांनी सातफेरे घेतले.या लग्नाची तयारी गेल्या कित्येक महिन्यांपासून सुरू होती. देश विदेशातून पाहुणे या लग्नासाठी दाखल झाले. विशेष म्हणजे बॉलिवूड कलाकार तर या लग्नात चांगलीच धमाल करताना दिसले. या लग्नातील अनेक फोटो आणि व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. लग्नात दाखल झालेल्या पाहुण्यांना तब्बल 2 कोटींचे घड्याळ देखील देण्यात आले. या घड्याळाचेही फोटो व्हायरल झाले.रिपोर्टनुसार अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांना Amazon चे माजी अध्यक्ष जेफ बेजोसने 11.50 कोटींची बुगाटी कार गिफ्टमध्ये दिलीये. अमेरिकेचा प्रोफेशनल रेसलर जॉन सीना याने 3 कोटींची लेम्बोर्गिनी कार गिफ्ट म्हणून दिलीये. हेच नाहीतर फेसबुकचे सीईओ मार्क झुकरबर्गने 300 कोटी किंमत असलेले प्राइवेट जेट गिफ्ट म्हणून दिले आहे. सुंदर पिचाईनेही 100 कोटींचेहेलिकॉप्टर गिफ्ट दिले आहे.विशेष म्हणजे या यादीमध्ये बॉलिवूड कलाकारही मागे नाहीत. आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांनी अनंत आणि राधिकाला 9 कोटींची मर्सिडीज कार गिफ्ट दिल्याचे सांगितले जाते. सलमान खान याने 15 कोटींची स्पोर्टस कार अनंत अंबानीला लग्नात दिली. अक्षय कुमार याने अनंत अंबानीला 60 लाखांचा सोन्याचा पेन गिफ्ट म्हणून दिला. कतरिना कैफ आणि विकी काैशल यांनीही 19 लाखांचे सोने गिफ्ट दिले.अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचे लग्न तब्बल तीन दिवस सुरू होते. यामध्ये विविध सेरेमनी पार पडल्या. पाहुण्यांसाठी लग्नात राहण्यासाठाी खास व्यवस्था अंबानी कुटुंबियांकडून करण्यात आली. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील या शुभ आर्शिवाद सेरेमनीमध्ये उपस्थित होते. यावेळी नरेंद्र मोदी हे अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांना आर्शिवाद देण्यासाठी पोहोचले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button