
सातवी राज्यस्तरीय कॅडेट तायक्वांडो स्पर्धेत रत्नागिरीतील दोघांना सुवर्णपदक
सातवी राज्यस्तरीय कॅडेट तायक्वांडो स्पर्धा चंद्रपूर भद्रावती येथे झाली. त्यामध्ये रत्नागिरीतील खेळाडूंनी या स्पर्धेत सहभाग घेत गौरी अभिजीत विलणकर हिने ५९ किलो वजनी गटात तर स्वरा विकास साखळकर हिने पूमसे प्रकारात सुवर्णपदक पटकावले.त्या खेळाडूंचे प्रशांत मनोज मकवाना, शाहरुख शेख, महिला प्रशिक्षक आराध्या मकवाना, खेळाडूंना यांचे मार्गदर्शन लाभत आहे. विजेते खेळाडूना तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्राचे अध्यक्ष डॉ. अविनाश भाराजगे, सचिव मिलिंद पाठारे, उपाध्यक्ष प्रविण बोरसे, खजिनदार व्यंकटेशराव करा, जिल्ह्याचे सचिव लक्ष्मण करा यांच्यासह सर्वानी अभिनंदन केले.