
चिपळूण शहरातील खेंड परिसरातील एका महिलेला अज्ञाताने ऑनलाईन पद्धतीने २ लाख ३२हजार रुपयांना गंडा घातला
चिपळूण शहरातील खेंड परिसरातील एका महिलेला अज्ञाताने ऑनलाईन पद्धतीने २ लाख ३२हजार रुपयांना गंडा घातला आहे. या प्रकरणी बुधवारी येथील पोलीस स्थानकात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
फिर्यादी महिला या इन्स्टाग्रामवर रिल्स पाहत असताना नोकरीविषयी जाहिरात दिसली. त्यावर त्यांनी क्लिक केले असता टेलिग्राम ऍपद्वारे अज्ञाताने या महिलेशी संवाद साधत विश्वास संपादन करत २ लाख ३२ हजारांची फसवणूक केली. त्यानुसार भा.दं.वि. कलम ४१९, ४२० व माहिती तंत्रज्ञान २००० चे कलम ६६ (क), (ड) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी चिपळूण पोलीस अधिक तपास करीत आहेत.
www.konkantoday.com