
खेड शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मोहन आंब्रे यांचे दुःखद निधन निधन
खेड तालुक्यातील चिरणी येथील पुलावर दोन दुचाकींचा मंगळवार 17 जून रोजी अपघात झाला होता. या अपघातात शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मोहन आंब्रे (65) यांना गंभीर दुखापत झाली होती. त्यांना उपचारासाठी कोल्हापूर येथे दाखल करण्यात आले होते. तेथे त्यांच्यावर उपचार सुरू असताना निधन झाले.
मोहन आंब्रे हे शिवसेनेतील जुन्या पिढीतील अत्यंत कार्यक्षम आणि कडव्या कार्यकर्त्यांपैकी एक मानले जात होते. तालुका प्रमुख, पंचायत समितीचे उपसभापती अशा महत्त्वाच्या जबाबदाऱ्या त्यांनी यशस्वीरित्या पार पाडल्या होत्या. चिरणी गावासह संपूर्ण खेड तालुक्यात त्यांचा सामाजिक आणि राजकीय प्रभाव होता.
त्यांच्या निधनामुळे खेड तालुक्यात शोककळा पसरली आहे. अनेक राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी श्रद्धांजली अर्पण केली.