चांदेराई बाजारपेठेतील पाणी पहाटे कमी झाले, दुकानात व रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य

गेले 4/5 दिवस कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे काल दिनांक 21 जुलै सकाळी 11 वाजता काजळी नदीचे पाणी चांदेराई बाजारपेठेत घुसले व सर्वांचीच गडबड उडाली. ST वाहतूक बंद झाली तर वैद्यकीय सेवा देखील बंद झाली होती , परंतु आता पावसाने देखील थोडी उसंत घेतली असून नदीची पाणी पातळी कमी झाली आहे. बाजारपेठे अनेक दुकानात पुराचे पाणी गेले होते त्यामुळे दुकानात व रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चिखल काढण्याचे काम सुरु आहे. गेले अनेक वर्षे हा पुराचा त्रास कधी संपायचा अशा प्रतीक्षेत येथील ग्रामस्थ आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button