
खेड शहरात २०२३ मध्ये अतिवृष्टीत ज्या नागरीकांचे नुकसान झाले, त्यांना भरपाई मिळावी
खेड शहरात २०२३ मध्ये अतिवृष्टीत ज्या नागरीकांचे नुकसान झाले, त्यांना भरपाई मिळावी यासाठी वारंवार अर्ज दिले.त्यानंतर पंचनामे झालेल्यांपैकी ८४ लोकांना ३१ मार्च २०२४ रोजी नुकसान भरपाई मिळाली. मात्र उर्वरित व्यापारी वर्गाला अजून भरपाईची प्रतीक्षाच आहे. ही नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी काँग्रेसतर्फे तहसीलदार सुधीर सोनवणे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.काँग्रेसतर्फे देण्यात आलेल्या निवेदनात नमूद केल्यानुसार, १५ रोजी पुन्हा एकदा अतिवृष्टीमुळे जगबुडी नदीचे पाणी खेड शहरात शिरले. त्यामुळे पूरस्थिती निर्माण झाली होती. यामध्ये व्यापाऱ्यांचे लाखो रुपयाचे नुकसान झाले आहे. याप्रसंगी झालेल्या पंचनाम्याच्या आधारे सर्व नुकसानग्रस्त व्यापाऱ्यांना तातडीच्या मदतीसाठी तात्काळ तरतूद करावी. तसेच २०२३ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे महापुरामध्ये झालेल्या नुकसानाची अजूनही काही व्यापाऱ्यांना नुकसान भरपाई मिळालेली नाही.