आठ दिवसांत जाहीर माफी मागा, अन्यथा अब्रु नुकसानीच्या दाव्याला सामोरे जाण्याची तयारी ठेवा, रामदास कदम यांचा संजय कदमाना इशारा
_वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांचे वडील दिलीप खेडकर यांच्यासोबत माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांचे देखील एसीबीने चौकशी करावी, अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाचे माजी आ.संजय कदम यांनी शुक्रवारी (दि.१९) पत्रकार परिषदेत केली होती. आता यावर कदम यांनी उत्तर दिले आहे. आठ दिवसांत जाहीर माफी मागा, अन्यथा अब्रु नुकसानीच्या दाव्याला सामोरे जाण्याची तयारी ठेवा, असा इशारा कदम यांनी दिला आहे. ते पत्रकारांशी बोलत होते.संजय कदमांचा समाचार घेताना रामदास कदम यांनी आपल्यावर केलेले आरोप हे खोडसाळ आणि खोटे असून संजय कदमांनी येत्या आठ दिवसांत जाहीर माफी मागावी, अन्यथा त्यांनी अब्रु नुकसानीच्या दाव्याला सामोरे जाण्याची तयारी ठेवावी, असा इशारा कदम यांनी पत्रकार परिषदेत दिला. इतक्या वर्षाच्या राजकीय कारकीर्दीत कधीही असे प्रकार केले नसून मंत्र्यांचा आणि बदल्यांचा संबंध येत नाही. आपल्यावर बिनबुडाचे आरोप करायचे आणि प्रसिद्धी मिळवायची हे संजय कदम यांचे धंदे असल्याचे त्यांनी सांगितले.www.konkantoday.com