आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या स्वबळावर लढणार-अजित पवार
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या स्वबळावर लढणार, असं अजित पवार यांनी जाहीर केलं आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काय-काय घडामोडी घडतात? ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. या निवडणुकीत अजित पवारांच्या घोषणेनुसार घटना घडल्या तर महायुतीमधील मित्रपक्षांचे उमेदवारच महापालिका निवडणुकांमध्ये वेगवेगळ्या वॉर्डमध्ये परस्परांच्या विरोधात उभे राहू शकतात.अजित पवार यांनी याबाबबतची मोठी घोषणा केली. स्थानिक स्वाराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढवणार असल्याची घोषणा अजित पवार यांनी केली. “स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या आपापल्या पक्षाने आपापल्या ताकदीवर लढवायच्या आहेत. त्यामुळे महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, तालुका पंचायत यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला तिथल्या कार्यकर्त्यांनी आपापल्या पक्षात काम व्यवस्थित करा”, अशा सूचना अजित पवारांनी कार्यकर्त्यांना दिल्या. “आपण लोकसभा निवडणूक, विधानसभा निवडणूक एकत्र लढत असलो तरी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका आपण स्वबळावर लढायच्या आहेत”, असं अजित पवार स्पष्ट म्हणाले आहेत.