सुंदरगडावर जलधारांच्या साक्षीने उत्साहात गुरुपूजन मुसळधार पावसातही भाविकांची प्रचंड गर्दी,
नाणीज दि.२१:- कोसळत्या जलधारांनी चिंब भिजणारा सुंदरगड, आकर्षक फुलांनी व रोषणाईने सजलेले संतपीठ, एवढ्या पावसातही आपल्या गुरुवरील श्रध्येपोटी जमलेला लाखो भक्तांचा सागर, मन प्रसन्न करणारे मंत्रस्वर आशा भारावलेल्या श्रध्येय वातावरणात आज येथे गुरुपूजन झाले. जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज यांनी सर्वाना भरभरून आशीर्वाद दिले. *रात्रभर भाविक आले*-एवढ्या पावसातही भाविक दुरदूरहून आले होते.रात्रभर भ भाविकांचे लोंढे येतहोते. पहाटेपासूनच भाविक मिळेल तिथे गुरुपूजन करण्यासाठी जागा पकडून बसले होते. पुरुष, महिला, मुले सारे छत्र्या, रेनकोट, प्लास्टीक कागद घेऊन, पूजनाचे साहित्य घेऊन जय्यत तयारीनिशी बसले होते. कोसळत्या पावसाची जराही तमा न बाळगता प्रत्येकजण पूजनामध्ये मग्न होता.*जगद्गुरुश्री आपल्या परिवारासह संत पिठावर*जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज यांचे सुंदरगडावर जयघोषात सहकुटुंब आगमन झाले. प्रथम त्यांनी सर्व देवदेवतांचे दर्शन घेतले. त्यानंतर ते संतपीठावर आले. त्यांच्यासमवेत प.पू. कानिफनाथ महाराज, गुरुमाता सौ सुप्रियाताई, सौ ओमेश्वरीताई, देवयोगी महाराज होते.*पूजेचा मान* -यावेळी संतपीठावर भक्तांमधून प्रातिनिधीक पूजेचा मान पुण्यातील अर्जुन महादेव फुले व सौ. भारती अर्जुन फुले या जोडप्याला मिळाला. वेदशास्त्र संपन्न भालचंद्र शास्त्री शौचे गुरुजी यांच्या समवेत ब्राह्मवृंद संपीठावर होता. त्यांच्या मागदर्शनानुसार विधीवत मंत्रघोषात सारे भाविक पूजा करीत होते. *एकाचवेळी लाखो भाविकांचे गुरुपूजन*-गुरुजी सांगतील तशी पूजा होत असल्याने सारे एकाचवेळी होत होते. गंध, फुले एकाच वेळी, आरती एकाच वेळी, हजारो घंटांचा किणकिणाट ही एकाचवेळी झाला. सारे वातावरण भक्तीने भारून टाकणारे होते.मोठी गर्दी, ४ तास पूजा- गुरुपौर्णिमा वारी उत्सवाला सर्व भाविकांनी उत्स्फूर्तपणे येण्याची प्रथा आहे. आठवडाभर सर्वत्र पाऊस असूनही सुंदरगडावर प्रचंड गर्दी जमली. जागा मिळेल तिथे, मिळेल त्या जागी भक्त परिवारासह गटागटाने पूजेला बसले होते. चार तास विधिवत पूजा चालली.गुरू दर्शनाचा आनंद-गुरुपौर्णिमेला सोहळ्यात सहभागी होणे, साक्षात आपल्या गुरूंचे दर्शन होणे, यासारखा दुसरा आनंद नसल्याची भावना येथे आलेल्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर होती. अनेकांनी चरणदर्शन घेतले.मंदिरात दर्शनास गर्दी-सुंदरगडावरील संतशिरोमणी गजानन महाराज मंदिर, प्रभू रामचंद्र मंदिर, वरद चिंतामणी मंदिर येथे दिवसभर दर्शनासाठी रांगा होत्या. अनेकजण नाथांचे माहेर येथे जाऊनही दर्शन घेत होते.*लाखोभाविकांसाठी चोविस तास प्रसाद वाटप* एवढी मोठ्या प्रमाणावर गर्दी असूनही येणाऱ्या प्रत्येक भाविकाला पोटभर प्रसाद मिळेल असे शिस्तबद्ध नियोजन करण्यात आले होतेयागाची सांगतायेथे कालपासून सुरू झालेल्या श्री सप्तचिरंजीव यागाची सांगता आज झाली. *रात्री प्रवचनाने सांगता* -रात्री साडेसातला प.पू. कानिफनाथ महाराज यांचे प्रवचन झाले. त्यानंतर भाविकांचे आकर्षण असलेल्या जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज यांचे अमृतमय प्रवचन झाले. त्यानंतर सोहळ्याची सांगता झाली.*आरोग्य शिबीराचा लाभ*-काल सकाळी सुरू झालेल्या मोफत आरोग्य शिबिराची सांगता आज सायंकाळी झाली. अनेक भाविकांनी त्याचा लाभ घेतला. नामवंत डॉक्टरनी शिबिरात तपासणी आणि उपचार केले.*वाहनांची गर्दी*-भाविक मोठ्या संख्येने स्वतःची व खासगी वाहने घेऊन आले होते. त्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. एस.टी. महामंडळाने दिवसभर जादा गाड्या सोडल्या होत्या. *चांगले नियोजन*-संपूर्ण सोहळ्याचे नियोजन अतिशय चांगले होते. प्रचंड गर्दी असूनही कुठे गडबडगोंधळ नव्हता. भक्त शिस्त पाळत होते. संस्थानाची स्वतःची वेगळी गर्दीला शिस्त लावणारी तरुण कार्यकर्त्यांची व्यवस्था होती. पोलिसांचा देखील बंदोबस्त होता. सुंदरगडावर जलधारांच्या साक्षीने उत्साहात गुरुपूजन मुसळधार पावसातही भाविकांची प्रचंड गर्दी,नाणीज दि.२१:- कोसळत्या जलधारांनी चिंब भिजणारा सुंदरगड, आकर्षक फुलांनी व रोषणाईने सजलेले संतपीठ, एवढ्या पावसातही आपल्या गुरुवरील श्रध्येपोटी जमलेला लाखो भक्तांचा सागर, मन प्रसन्न करणारे मंत्रस्वर आशा भारावलेल्या श्रध्येय वातावरणात आज येथे गुरुपूजन झाले. जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज यांनी सर्वाना भरभरून आशीर्वाद दिले. *रात्रभर भाविक आले*-एवढ्या पावसातही भाविक दुरदूरहून आले होते.रात्रभर भ भाविकांचे लोंढे येतहोते. पहाटेपासूनच भाविक मिळेल तिथे गुरुपूजन करण्यासाठी जागा पकडून बसले होते. पुरुष, महिला, मुले सारे छत्र्या, रेनकोट, प्लास्टीक कागद घेऊन, पूजनाचे साहित्य घेऊन जय्यत तयारीनिशी बसले होते. कोसळत्या पावसाची जराही तमा न बाळगता प्रत्येकजण पूजनामध्ये मग्न होता.*जगद्गुरुश्री आपल्या परिवारासह संत पिठावर*जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज यांचे सुंदरगडावर जयघोषात सहकुटुंब आगमन झाले. प्रथम त्यांनी सर्व देवदेवतांचे दर्शन घेतले. त्यानंतर ते संतपीठावर आले. त्यांच्यासमवेत प.पू. कानिफनाथ महाराज, गुरुमाता सौ सुप्रियाताई, सौ ओमेश्वरीताई, देवयोगी महाराज होते.*पूजेचा मान* -यावेळी संतपीठावर भक्तांमधून प्रातिनिधीक पूजेचा मान पुण्यातील अर्जुन महादेव फुले व सौ. भारती अर्जुन फुले या जोडप्याला मिळाला. वेदशास्त्र संपन्न भालचंद्र शास्त्री शौचे गुरुजी यांच्या समवेत ब्राह्मवृंद संपीठावर होता. त्यांच्या मागदर्शनानुसार विधीवत मंत्रघोषात सारे भाविक पूजा करीत होते. *एकाचवेळी लाखो भाविकांचे गुरुपूजन*-गुरुजी सांगतील तशी पूजा होत असल्याने सारे एकाचवेळी होत होते. गंध, फुले एकाच वेळी, आरती एकाच वेळी, हजारो घंटांचा किणकिणाट ही एकाचवेळी झाला. सारे वातावरण भक्तीने भारून टाकणारे होते.मोठी गर्दी, ४ तास पूजा- गुरुपौर्णिमा वारी उत्सवाला सर्व भाविकांनी उत्स्फूर्तपणे येण्याची प्रथा आहे. आठवडाभर सर्वत्र पाऊस असूनही सुंदरगडावर प्रचंड गर्दी जमली. जागा मिळेल तिथे, मिळेल त्या जागी भक्त परिवारासह गटागटाने पूजेला बसले होते. चार तास विधिवत पूजा चालली.गुरू दर्शनाचा आनंद-गुरुपौर्णिमेला सोहळ्यात सहभागी होणे, साक्षात आपल्या गुरूंचे दर्शन होणे, यासारखा दुसरा आनंद नसल्याची भावना येथे आलेल्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर होती. अनेकांनी चरणदर्शन घेतले.मंदिरात दर्शनास गर्दी-सुंदरगडावरील संतशिरोमणी गजानन महाराज मंदिर, प्रभू रामचंद्र मंदिर, वरद चिंतामणी मंदिर येथे दिवसभर दर्शनासाठी रांगा होत्या. अनेकजण नाथांचे माहेर येथे जाऊनही दर्शन घेत होते.*लाखोभाविकांसाठी चोविस तास प्रसाद वाटप* एवढी मोठ्या प्रमाणावर गर्दी असूनही येणाऱ्या प्रत्येक भाविकाला पोटभर प्रसाद मिळेल असे शिस्तबद्ध नियोजन करण्यात आले होतेयागाची सांगतायेथे कालपासून सुरू झालेल्या श्री सप्तचिरंजीव यागाची सांगता आज झाली. *रात्री प्रवचनाने सांगता* -रात्री साडेसातला प.पू. कानिफनाथ महाराज यांचे प्रवचन झाले. त्यानंतर भाविकांचे आकर्षण असलेल्या जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज यांचे अमृतमय प्रवचन झाले. त्यानंतर सोहळ्याची सांगता झाली.*आरोग्य शिबीराचा लाभ*-काल सकाळी सुरू झालेल्या मोफत आरोग्य शिबिराची सांगता आज सायंकाळी झाली. अनेक भाविकांनी त्याचा लाभ घेतला. नामवंत डॉक्टरनी शिबिरात तपासणी आणि उपचार केले.*वाहनांची गर्दी*-भाविक मोठ्या संख्येने स्वतःची व खासगी वाहने घेऊन आले होते. त्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. एस.टी. महामंडळाने दिवसभर जादा गाड्या सोडल्या होत्या. *चांगले नियोजन*-संपूर्ण सोहळ्याचे नियोजन अतिशय चांगले होते. प्रचंड गर्दी असूनही कुठे गडबडगोंधळ नव्हता. भक्त शिस्त पाळत होते. संस्थानाची स्वतःची वेगळी गर्दीला शिस्त लावणारी तरुण कार्यकर्त्यांची व्यवस्था होती. पोलिसांचा देखील बंदोबस्त होता.