सध्या मराठी सिनेसृष्टीतील एक अभिनेता कोकणात भात लावणीमध्ये रमलाय
सध्या मराठी सिनेसृष्टीतील एक अभिनेता कोकणात भात लावणीमध्ये रमला आहे. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे. हा अभिनेता म्हणजे अभिजीत केळकर.सोशल मीडियावर अभिनेत्याने त्याचा कोकणातील भात लावणीचा अनुभव चाहत्यांसोबत शेअर केला आहे. दरम्यान, व्हिडीओमध्ये अभिजीत अलिबाग येथे आपल्या मित्राच्या गावी भात लावणीचा आनंद लूटताना दिसत आहे. स्वत:च्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवरून त्याने हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये भर पावसात भिजत अभिनेता भात लावणी करताना दिसतोय.या व्हिडिओमध्ये अभिजीत म्हणतो, “मी कोकणातला आहे आणि या गोष्टीचा मला कायमच खूप अभिमान आहे. पण तसं असूनही इतक्या वर्षांमध्ये पावसाळ्यात कोकणात येण्याची संधी मिळाली नव्हती, किंवा तशी कधी वेळ आली नाही; कारण कोणत्या ना कोणत्या कारणामुळे बिझी असायचो. पण यावेळी मी आणि माझ्या मित्राने ठरवलं होतं. त्याचं अलिबागजवळ छोटसं गाव आहे तिथे एक देऊळ आहे, तर तिकडे आम्ही आलोय. पावसाचा मनमूराद आनंद लूटतोय. त्याचबरोबर आम्ही इथे लावणीचा प्रत्यक्ष शेतात येऊन आनंद घेतला”.पुढे अभिजीत केळकर म्हणतो,” इथे येऊन या सगळ्या लोकांचं प्रेम अनुभवलं. हे, हिरवंगार गवत हातात घेतल्यानंतर त्याचा अनुभव कसा असतो. शिवाय इतका पाऊस माती पायाला मऊ कशी लागते, याचा स्वर्गीय आनंद कोकणात येऊन उपभोगला”. सोशल मीडियावर अभिजीत केळकरच्या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.