
शिवसेना उबाठाच्या युवासेना पदाधिकार्यांनी राष्ट्रीय महामार्ग कार्यालयावर धडक देत अधिकार्यांना विचारला जाब
_गुहागर-चिपळूण मार्गावर मिरजोळी येथे पडलेल्या खड्ड्यांमुळे होणार्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उबाठाच्या युवासेना पदाधिकार्यांनी राष्ट्रीय महामार्ग कार्यालयावर धडक देत ठेकेदार मनिषा कन्स्ट्रक्शन तसेच अधिकार्यांना घेराव घालत जाब विचारला. केवळ खड्डे बुजवू नका, कायमस्वरूपी उपाययोजना करा, अशी मागणी केली.यावर पाऊस कमी झाल्यानंतर या रस्त्याची उंची वाढवून रस्त्याचे कॉंक्रीटीकरण करण्यात येईल. तसेच रस्त्यालगत गटारे काढून बंद झालेले नैसर्गिक नाले मोकळे करण्यात येतील, असे उत्तर अधिकार्यांकडून देण्यात आले.www.konkantoday.com